Thursday, 21 March 2013

काबुकी



हा एक लोकप्रिय जपानी नाट्यप्रकार आहे . काबुकी हा शब्द ‘काबुकू’ या क्रियापदापासून तयार झाला. त्याचा मूळ अर्थ ‘प्रवृत्त’ किंवा ‘उद्युक्त करणे’ असा होतो. काबुक हे क्रियापद सध्यातरी जपानी भाषेत अस्तित्वात नाही. नवव्या शतकात नटांचा निर्देश करण्यासाठी ही संज्ञा वापरत असल्याचा पुरावा मिळतो.
अलीकडे मात्र काबुकी शब्दातील तीन ध्वनींवर आधारित असा या संज्ञेचा अर्थ करण्यात येतो, तो असा : ‘का’ म्हणजे गीत, ‘बु’ म्हणजे नृत्य व ‘की’ म्हणजे अभिनय-कौशल्य. या वरून गीत-नृत्य-नाट्य यांचा संगम म्हणजे काबुकी असे समीकरण रूढ झाले आहे. काबुकीचे अनेक प्रकार आहेत. काही ग्राम्य प्रकार तमाशासारखे आहेत, तर इतर ऐतिहासिक किंवा नृत्ये असलेले आहेत.
काबुकी-नाट्यप्रकाराची सुरुवात १५९६ मधील एका प्रसंगातून झाली, असे म्हटले जाते. पुराणकालीन कथाप्रसंग, शोकांतिका ऐतिहासिक कथानके व सामाजिक प्रेमकथा हे आजच्या काबुकीचे विषय आहेत.  त्यांतील  आविष्कार नृत्य व संगीत यांच्या द्वारे ढंगदार शैलीने करण्यात येतो. कथानक अगदी साधे आणि सर्वसाधारण एकाच प्रसंगावर आधारलेले असते. त्यातच मग विदूषकी प्रहसन, परंपरागत पद्धतीची भारी व भडक रंगांची   वेशभूषा, लेप, मुखवटे, रंगीबेरंगी व झगमगीत रंगमंच या साऱ्यांचे वैचित्र्यपूर्ण संमिश्रण केलेले असते..
काबुकी नाट्यप्रकारात परंपरेने सर्वांत अधिक महत्व नटांना प्राप्त झाले आहे. तसेच त्यातील ‘नृत्य’ घटक अत्यंत महत्वाचा मानला जातो. नृत्यप्रकारांची विविधताही त्यात आढळते. म्हणूनच संगीतिकेपेक्षा हा प्रकार वेगळा व अधिक व्यापक ठरतो. फिरता रंगमंच, ट्रॅप-लिफ्ट व हानामिची ही काबुकीची खास वैशिष्ट्ये आहेत.
नृत्य, नाट्य, संगीत, दृश्यसौंदर्य इ. अंगांनी परिपूर्ण असलेला हा नाट्यप्रकार जागतिक रंगभूमीच्या क्षेत्रात अनन्यसाधारण  मानला जातो. या नाट्यप्रकारात लवचिकता, विकसनशीलता हेही गुण असल्याने आधुनिक काळात तो प्रभावी ठरला.
जपानमध्ये काबुकी नाट्यप्रकारांसाठी वेगवेगळी रंगमंदिरे वापरतात. काबुकी प्रकारात फिरते रंगपीठ, रंगभूमीवरील चोरदरवाजे, वादळ व भूकंपाचे आभास ह्या सर्वांचा वापर फार रुंद व कमी खोल रंगपीठावर करण्यात येई. रंगपीठाची अवास्तव लांबी नटांच्या आडव्या हालचालींमुळे जरुरीची होती. काबुकीत रंगपीठाच्या उजव्या बाजूस चढत जाणारी व समूहदृश्ये, मिरवणुकी व पीठप्रवेश यांसाठी वापरावयाची फुलांची वाट ही खास वैशिष्ट्ये आहेत.

ध्वनी




एखादी वस्तू, पदार्थाच्या एकमेकांतील कंपनामुळे ध्वनी (साऊन्ड) निर्माण होतो आणि त्या ध्वनी हवेतील आपला प्रवास करून सरळ आपल्या कानावर धडकतात (येथे आपल्या कानांना ऐकू येत असेल तर त्याची जाणिव होईल नाहीतर नाही.). अशी ही ध्वनी निरनिराळ्या प्रकारची असते. एकुणच या ध्वनीचं मानवी जिवनांत अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. ज्यांस ऐकू येत नाही ते मात्र यांस अपवाद आहेत.  
चित्रपटांच्या दृष्टीकोनातून यावर चर्चा करायची झाल्यास त्यात देखिल ध्वनीला महत्त्वाचे स्थान असल्याचे आपण अनुभवले असेल. भारतीय चित्रपटांची मुहूर्तमेढ मुकपटांद्वारेच रोवली गेली. त्यामुळे ध्वनी विरहीत चित्रपट देखिल केवळ समोर दिसणा-या चित्रांच्या सहाय्यानेच लोकप्रिय ठरले. परंतू जेव्हा या चित्रपटांना आवाजाची साथ लाभली, त्यामध्ये विविध प्रकारच्या संगिताचा समावेश झाला तेव्हापासून चित्रपट सृष्टीला चार चांद लागले आणि ख-या अर्थाने  भारतीय चित्रपटसृष्टी उदयास आली असेच म्हणावे लागेल.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात ध्वनी प्रकारात विविधता आली ती केवळ करण्यात आलेल्या प्रयोगांमुळेच. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण आवाजाची मेजवानीच प्रेक्षकांना लाभली. 
आजच्या काळात एखादा चित्रपट पाहत असताना त्यातील ध्वनी प्रकारामुळे वातावरणात वेगळा असा माहोल तयार होतो. त्याचप्रमाणे त्या  चित्रपटाच्या कथेलाही एकप्रकारची जान येते. म्हणूनच ध्वनी हा महत्त्वाचा घटक आहे. चित्रपटातील ध्वनी हा संगित रूपातील असल्याने त्यात शिस्त, सुसुत्रता, संगितकाराने ओतलेली भावना, त्या संगिताला लाभलेली गायकीची साथ त्याचप्रमाणे पात्रामधिल संवाद, संवादातील चढ-उतार, संवाद पध्दती इत्यादी गोष्टींमध्ये आपणांस विविधता आढळून येते. आणि ध्वनीच्या रूपातील हिच विविधता चित्रपटाच्या कथेसाठी महत्त्वाची ठरते.
आज आपण आजूबाजुला वावरत असताना अनेकप्रकारचे आवाज आपल्या कानांवर पडत असतात. असे हे आवाज निट लक्ष देऊन ऐकल्यास त्यात देखिल सुसुत्रता असल्याचे आढळून येते, उदा. लोकलट्रेनचा आवाज, त्याचबरोबर येणारा रूळांचा आवाज, विविध ब्रँडच्या कार-बाईक्स, प्राणी-पक्षी, वाहत्या पाण्याचा आवाज, वादळातील,पावलांचा आवाज इत्यादी अनेक गोष्टी आपणांस चित्रपटांमध्येही ऐकावयास मिळत असतात. त्याचप्रमाणे ख-या आयुष्यातही आपण वरील गोष्टी न पाहताही केवळ आवाजांमुळेच ओळखू शकतो, ते केवळ त्यांतील आवाजाच्या विविधतेमुळेच.