Thursday, 21 March 2013

ध्वनी




एखादी वस्तू, पदार्थाच्या एकमेकांतील कंपनामुळे ध्वनी (साऊन्ड) निर्माण होतो आणि त्या ध्वनी हवेतील आपला प्रवास करून सरळ आपल्या कानावर धडकतात (येथे आपल्या कानांना ऐकू येत असेल तर त्याची जाणिव होईल नाहीतर नाही.). अशी ही ध्वनी निरनिराळ्या प्रकारची असते. एकुणच या ध्वनीचं मानवी जिवनांत अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. ज्यांस ऐकू येत नाही ते मात्र यांस अपवाद आहेत.  
चित्रपटांच्या दृष्टीकोनातून यावर चर्चा करायची झाल्यास त्यात देखिल ध्वनीला महत्त्वाचे स्थान असल्याचे आपण अनुभवले असेल. भारतीय चित्रपटांची मुहूर्तमेढ मुकपटांद्वारेच रोवली गेली. त्यामुळे ध्वनी विरहीत चित्रपट देखिल केवळ समोर दिसणा-या चित्रांच्या सहाय्यानेच लोकप्रिय ठरले. परंतू जेव्हा या चित्रपटांना आवाजाची साथ लाभली, त्यामध्ये विविध प्रकारच्या संगिताचा समावेश झाला तेव्हापासून चित्रपट सृष्टीला चार चांद लागले आणि ख-या अर्थाने  भारतीय चित्रपटसृष्टी उदयास आली असेच म्हणावे लागेल.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात ध्वनी प्रकारात विविधता आली ती केवळ करण्यात आलेल्या प्रयोगांमुळेच. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण आवाजाची मेजवानीच प्रेक्षकांना लाभली. 
आजच्या काळात एखादा चित्रपट पाहत असताना त्यातील ध्वनी प्रकारामुळे वातावरणात वेगळा असा माहोल तयार होतो. त्याचप्रमाणे त्या  चित्रपटाच्या कथेलाही एकप्रकारची जान येते. म्हणूनच ध्वनी हा महत्त्वाचा घटक आहे. चित्रपटातील ध्वनी हा संगित रूपातील असल्याने त्यात शिस्त, सुसुत्रता, संगितकाराने ओतलेली भावना, त्या संगिताला लाभलेली गायकीची साथ त्याचप्रमाणे पात्रामधिल संवाद, संवादातील चढ-उतार, संवाद पध्दती इत्यादी गोष्टींमध्ये आपणांस विविधता आढळून येते. आणि ध्वनीच्या रूपातील हिच विविधता चित्रपटाच्या कथेसाठी महत्त्वाची ठरते.
आज आपण आजूबाजुला वावरत असताना अनेकप्रकारचे आवाज आपल्या कानांवर पडत असतात. असे हे आवाज निट लक्ष देऊन ऐकल्यास त्यात देखिल सुसुत्रता असल्याचे आढळून येते, उदा. लोकलट्रेनचा आवाज, त्याचबरोबर येणारा रूळांचा आवाज, विविध ब्रँडच्या कार-बाईक्स, प्राणी-पक्षी, वाहत्या पाण्याचा आवाज, वादळातील,पावलांचा आवाज इत्यादी अनेक गोष्टी आपणांस चित्रपटांमध्येही ऐकावयास मिळत असतात. त्याचप्रमाणे ख-या आयुष्यातही आपण वरील गोष्टी न पाहताही केवळ आवाजांमुळेच ओळखू शकतो, ते केवळ त्यांतील आवाजाच्या विविधतेमुळेच.

No comments:

Post a Comment