गरिबी ते गुन्हेगारी
अशा जीवनप्रवासाचे अप्रतिम चित्रण ' द
बायसिकल थीव्स ' या चित्रपटात केले आहे. त्या काळच्या
युद्धानंतरच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा,व आजच्यासारख्या गल्लाभरू चित्रपटांचा स्पर्श नसलेला हा चित्रपट नववास्तववादी चित्रपट आहे. त्या काळात या चित्रपटाचे
चित्रीकरण स्टुडियो मध्ये न करता प्रत्यक्ष रस्त्यावर, गर्दीमध्ये,
लोकांमध्ये जाऊन चित्रीकरण केले. आणि
त्यामुळेच चित्रपटाला नाटकी बाज न येता, वास्तववादाचा स्पर्श
मिळाला आहे.
चित्रपटाचे
कथानक हे समजायला सोपे तरीही भावभावनांची गुंतागुंत आणि
आशयाची खोली समजून घेण्यासाठी चित्रपट पुन्हापुन्हा पाहावासा वाटतो. चित्रपटाचे
संपूर्ण कथानक हे दोन पात्रांभोवती फिरते. अँटोनिओ (lamberto
maggiorani) आणि त्याचा मुलगा ब्रुनो (Enzo staiola). बेरोजगार अँटोनिओला पोस्टर चिटकवण्याची नोकरी मिळते.
परंतु त्यासाठी त्याच्याकडे सायकल असण्याची अट असते. त्यासाठी तो घरातील सामान
गहाण ठेवतो. परंतु नोकरीच्या पहिल्याच दिवशी त्याची
सायकल चोरीला जाते. आणि इथूनच खऱ्या अर्थाने चित्रपटाला
सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी अँटोनिओ ब्रुनोला घेऊन त्याची सायकल शोधायला निघतो. या सायकल शोधण्याच्या
वेडामध्ये तो मुलापासून लांब होत जातो. त्याच्याकडे अजाणतेपणे दुर्लक्ष करत राहतो.
आणि सायकल गेली म्हणून नोकरी जाऊ नये म्हणून सायकल चोरण्यास
कसा प्रवृत्त होतो. या सर्व गोष्टींची सृजनशील मांडणी चित्रपटात केलेली दिसते.
चित्रपटातील कलाकार अँटोनिओ आणि
ब्रुनो हे कला क्षेत्रातले नसूनही दिग्दर्शकाने त्यांच्यातील अभिनय फारच उत्तमरीत्या
काढून घेतला आहे. चित्रपट हा प्रेक्षकांना आवडला पाहिजे त्यांच्या आयुष्य्तालाच एक
भाग वाटला पाहिजे म्हणून दिग्दर्शकाने कलाकारांची निवड करताना यांना निवडले. तसेच
कॅमेरा मुद्दामच साधेपणाने हाताळला आहे. चित्रपटामध्ये बऱ्याच ठिकाणी सिलुहेट शॉटस घेण्यात आले आहेत. कारण चित्रपटातील बरेच प्रसंग हे
दुखः व्यक्त करणारे आहेत. आणि नकारात्मकता बिंबवण्यासाठी सिलूहेट शॉटस उपयोगी
ठरतात. चित्रपटात उत्कंठा वाढवण्यासाठी बऱ्याच प्रसंगाच्या
वेळी संगीताचा वापर सृजनशीलरित्या केला आहे.
चित्रपटात ब्रुनो ह्या पात्राची अवस्था मनाला चटका लाऊन
जाते. सुरुवातीच्या प्रसंगातूनच गरिबीमुळे हरवलेले
त्याचे बालपण दिसते. तर पुढील प्रसंगातून बापाचे आपल्याकडे होणारे दुर्लक्ष सहन करणारा,
बापाची असहायता पाहणारा, आणि आपल्याच बापाला
चोरी करून मार खाताना बघणारा हा ब्रुनो शेवटी बापासाठी उपयोगी ठरतो. कारण
त्याच्याकडे पाहूनच त्याच्या बापाला सोडण्यात येते. हे सर्व पाहताना
त्याच्याविषयीची सहानुभूती वाढत जाते.
चित्रपट पाहताना प्रत्येक वेळी त्यची सायकल आता भेटेल मग
भेटेल असे वाटत राहते. असा सरळमार्गी मनुष्य चोरी करेल, असे
पाहणारा विचार देखील करणार नाही. आणि तेंव्हाच त्याच्या मनात चोरीचा विचार येणे
आणि त्याच्या मुलासमोर पकडले जाने असा दुखःद शेवट होतो.
No comments:
Post a Comment