Thursday, 21 March 2013

Sergei Eisenstein



Sergei Eisenstein हा एक रशियन चित्रपट दिग्दर्शक आणि सिनेमा विचारक म्हणून ओळखले जाते. सेर्गेई आइनस्टाईन हा रुपवाद वास्तववाद या सिध्दांतासाठी तो प्रसिध्द आहे.  तसेच त्याला मोन्टाजचा (Montage) जनक सुध्दा मानल जातो. त्याने आपल्या मूकपटात विशेषत स्ट्राईक Strike (१९२४), बॅटलशिप पोटनकीन Battleship Potemkin (१९२५), आणि ऑक्टोंबर October (१९२७) त्याचबरोबर हिस्टॉरिकल  इपीकस अलेकझान्डंर नेवस्की The Historical epics Alexander Nevsky (१९३८), आणि इवान टरनिबल Ivan the Ternible (१९४८,१९५८) या चित्रपटात त्याने मोन्टाज (Montage) योग्य प्रकारे वापर केला. तसेच
     आइनस्टाईन यांनी चित्रपट संकलनात मोन्टाजचा व्यवस्थीत वापर करण्या तो पुढे होता. आइनस्टाईन आणि त्याचे समकालीन लेव कुलेशोव Lev Kuleshov यांनी मोन्टाज Montage हा सिनेमासाठी विशेष गुण असल्याचे म्हटले. त्यांनी आपल्या लेखातून आणि पुस्तकातून त्यामध्येफिल्म फॉर्म’ (Film Form) आणिफिल्म सेन्स’ (Film Sence), यातून योग्य प्रकारे आणि विस्तृतपणे मोन्टाज Montage ची माहिती दिली आहे आणि त्याचा वापर सिनेमात होत आहे. त्याच्या या लिखाणाचा मुख्य परिणाम काही चित्रपट निर्मात्यावर वेळोवेळी होत आहे,
     आइनस्टाईनने आपल्या थेअरीमध्ये म्हटल्याप्रमाणे, प्रेक्षकांच्या भावनांना इकडून तिकडे नेण्यासाठी त्यांना टक्कर देण्यासाठी चित्रपटात त्यांनी याचा वापर केला त्याला आपल्या कल्पनांनवर भरोसा होता. त्यातून त्याने चित्रपटामध्ये दोन दृश्य एकत्र करण्यासाठी, दृश्याच्या जागा इकडून तिकडे करण्यासाठी मोन्टाजचा वापर केला. त्याने आपल्या थेअरीमध्ये बदल केलेल्या “Method of Montageम्हणतात.
आइनस्टाईनने रुपकवाद वास्तववादावर रडॉल्फ अर्नहिमप्रमाणे सिध्दांत मांडला आहे. तसेच आइनस्टाईन यांचे दिग्दर्शन, फोटोग्राफी आणि संकलन यांची ही पध्दती अभ्यासासाठी वापरतात. आइनस्टाईनने आपल्या चित्रपटासाठी पहिले पेशावर अभिनेत्यांचा उपयोग केला नाही. त्याचबरोबर अभिनयासाठी अप्रशिक्षीत लोकांना त्यांनी आपल्या चित्रपटात संधी दिली. ते प्रसिध्द कलाकारांपासून दूर राहिले. रशियन चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी काम केले. आइनस्टाईन हे आपल्या चित्रपटातून संघर्ष, सामाजिक प्रश्न, साम्यवादी विचार मांडत असत.

No comments:

Post a Comment