Thursday, 21 March 2013

Rudolf Arnhiem – Sound is a cancer




         चित्रपटावर जसे रडॉल्फ अर्नहिम यांनी थेअरी, विचार मांडले पुस्तके लिहिली आहे. तसेच चित्रपटामध्ये बदल विकासाबरोबर अर्नहिम यांचे वेगळे विचारही होते त्यांच्या मते, चित्रपटात आवाज (Sound) हा एक कॅंन्सर आहे. आवाजामुळे चित्रपटात जे दृश्य स्वरुपात दाखविले जाते त्याचे महत्त्व कमी होते. तसेच कलेचे महत्त्वही कमी होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. सुरुवातीच्या काळात चित्रपट हे मुखपट होते, त्यामध्ये आवाज नव्हता त्यामुळे संवाद हा देहबोलीतून सादला जायचा. त्यामुळे चित्रपटात कलेला जास्त महत्त्व प्राप्त झाले होते.
     अर्नहिम यांच्या काळात मुखपटांची निर्मिती होत असे त्यामुळे चित्रपटात आवाज नावाचा प्रकार नव्हता मात्र जसे तंत्रज्ञान विकसित होते गेले तसे चित्रपटातही बदल विकास होत गेला. या तंत्रज्ञानावर अर्नहिम यांनी अभ्यास केला सिनेमात आवाज हा एक कर्करोग आहे असा त्यांनी निष्कर्ष काढला. कारण आवाजामुळे चित्र/दृश्यांची महत्व कमी झाल्याचे त्यांचे मत आहे. चित्रपट हे दृश्य माध्यम असल्याने ज्याप्रकारची ताकत ही चित्रात आहे तेवढी ताकत हे चित्रपट समजतांना आवाजात नाही असे त्यांचे म्हणणे होते.
     चित्रपटात जे दृश्यरुपात दाखविले जाते. त्याला तंत्रज्ञान विकासामुळे चांगली जोड मिळाली हे जरी खरी असले तरी अर्नहिम यांचे विचार चित्रपट आवाज याबद्दल मात्र वेगळे आहे. यासाठी त्यांनी संशोधन करुन Sound is a Cancer हा विचार जगासमोर मांडले या विचाराशी किती चित्रपट सहमत आहेत हे अभ्यासणे आवश्यक आहे. हा  विचार चित्रपट अभ्यास करतांना महत्त्वाचा ठरतो.

No comments:

Post a Comment