रडॉल्फ अर्नहीम या चित्रपट विचारकाचा जन्म १९०४ मध्ये जर्मनीत झाला. अर्नहिमने हा एक सायकोलॉजीस्ट सुध्दा होता. त्याने अनेक पुस्तके लिहिली. आर्ट ऍन्ड परफेक्ट परसेप्शन: अ सायकोलॉजी ऑफ परफेक्ट आय (१९५४), विझवल थिकींग (१९६९), आणि द पावर ऑफ द सेंटर: अ स्टडी ऑफ कम्पोझीशन इन द विझवल आर्टस (१९८२) अशा चित्रपटाशी संबंधीत पुस्तकांची निर्मिती केली. चित्रपटाला एक नवीन दिशा देण्याचे काम अर्नहिम यांनी केले. त्यांनी चित्रपटासाठी जे थेअरी मांडली त्यामध्ये रुपवाद व वास्तववाद यांचा समावेश केला जातो.
अर्नहिम यांनी चित्रपटात कला आणि दृश्य याचे महत्त्व स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी १९५४ मध्ये मनोवृत्ती व दृश्य यांचाही त्यांनी अभ्यास केला. त्याच बरोबर १९६९ मध्ये त्यांनी विज्युअल थिकींग या पुस्तकातून चित्रपटातील दृश्य व त्याचा विचार कसा करावा यासाठी हे विचार पुस्तकात मांडले. तसेच त्यांनी मांडलेल्या थेअरीचा अभ्यास चित्रपट अभ्यास करतांना केला जातो. चित्रपट हे प्रभावी माध्यम असल्याने त्यामुळे प्रेक्षकांना त्यामधून चित्रपटात कलेचा वापर हा प्रभावीपणे झाला पाहिजे यावर त्यांचा भर होता. त्याचबरोबर त्यांनी सर्गेई आइनस्टाईन यांच्याप्रमाणे चित्रपटात वास्तववाद यावा यासाठी यावरही त्यांनी भर दिला. चित्रपटातून जे दाखविले जाते ते कशाप्रकारे पूर्ण करता येईल यांचाही व चित्रपटाचा विकास होईल यावरही अर्नहिम यांचा भर होता. आपल्या लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपटासाठी काही थेअरी मांडून चित्रपटात बदल व विकास करण्याचा अर्नहिम यांनी प्रयत्न केला.
No comments:
Post a Comment