Thursday, 21 March 2013

Richard Wolheim’s three approaches to art



     रिचर्ड होलहीम हे एक ब्रीटीश फिलॉसॉफर होते. त्यांनी मानवी भावना कला यावर संशोधन काम करुन एक सिध्दांत मांडला आणि विशेष करुन दृश्य कला चित्रकला यावर त्यांनी आपले विचार मांडले. त्यांचा विशेष भर हा चित्रकला त्यातून एक्प्रेस होणारे चित्र या कलेचे महत्त्व लोकासमोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी चित्रकलेचा वापर हा भावना व्यक्त करण्यासाठी कसा केला जावू शकतो तसेच एका चित्रातून आपण कोणत्याही प्रकारचे एक्प्रेशन देवू शकतो हेही त्यांनी दाखवून दिले.
     रिचर्ड यांना कलेची आवड होती त्यातूनच पुढे त्यांनी अनेक प्रकारचे चित्रण केले त्यातून मानवी भावना कशा व्यक्त करु शकता ते इतर कलेपेक्षा किती प्रभावी आहेत. हेही त्यांनी कलेच्या माध्यमातून दाखवून दिले. त्याचबरोबर त्यांनी या कलेचा वापर हा चित्रपटात कसा केला जावू शकतो यावरही त्यांनी भर दिला. आपल्या विचार कल्पनेच्या माध्यमातून त्यांनी चित्रकलेचा वापर हा मानवी भावनांचा अभ्यास करण्यासाठी केला. तसेच कल्पना, लूक, विचार, भावना या सर्व गोष्टीवर त्यांनी खोलवर अभ्यास केला आहे. त्यांनी कलेचा वापर हा चित्रपट निर्मितीत कसा केला जावू शकतो यावरही आपले विचार मांडले. चित्रकले प्रमाणे इतर कलांचा वापर हा चित्रपटात होतांना आपल्याला दिसून येईल.

No comments:

Post a Comment