डिफामिलायरीझशन ही थेअरी आपल्याला रशियन साहित्यात दिसून येते. कलात्मक भाषा/ साहित्यीक भाषात व साधारण भाषा यातील फरक आपल्याला दिसून येतो. लोकांना ऎकण्यासाठी, बघण्यासाठी, विचार, भावना यावर नियंत्रण करुन हे सर्व करण्यास या थेअरीच्या आधारे मजबूर करु शकतो. लोकांना एक प्रकारची सवय लागलेली असते ते बदलण्यासाठी या सिध्दांताचा वापर केला जातो. एक वेगळ्या प्रकारचा आवाज, वेगळे दिसणे ह्या गोष्टी आपण कधीतरी करत असतो, त्यामुळे ते एक वेगळ्या प्रकारचा अनुभव असतो.
उत्तराआधुनिक, महानाटक आणि विज्ञान कथा, आंदोलने यासाठी लोकांना एकत्रीत करण्यासाठी तसेच संस्कृतीसाठी सुध्दा या थेअरीचा वापर होतो. (कला आणि तंत्रज्ञान) ही एक कवीता करण्यासाठी वापरली जाणारी भाषा आहे जे की समजायला कठीण होती. कवितेची भाषा ही इतर भाषापेक्षा वेगळी आहे कारण आपण ती प्रत्येक दिवशी वापरत नाही कारण ती समजायला खुप कठीण आहे. या कलात्मक भाषेचा वापर हा चित्रपटांमध्ये केला जातो. Shklovsky या रशियन लेखकाने कलात्मक भाषा व रोजची भाषा यातील फरक सांगितला आहे.
या थेअरीचा वापर चित्रपटात होत असतो, Leo Tolstoy यांचे युध्द व शांतता हे प्रसिध्द उदाहरण यासाठी प्रसिध्द आहे. कॅपीटल पनीशमेंन्ट कशी देतात आणि युध्द हे ज्याप्रकारे चित्रपटात दाखविले जाते त्यामधून प्रेक्षकांना गोंधळात व त्यांच्या भावनांना परेशान करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण जे बघतो, ऎकतो हे का करतो हे बरोबर आहे का? हे आपल्याला चित्रपटात Defamiliarization या सिध्दांत्नातून दिसून येते.
No comments:
Post a Comment