Thursday, 21 March 2013

Spectatorship



ही एक ज्ञानाची संकल्पना आहे, यामध्ये अनेक भावनीक गोष्टींचा समावेश होत असुन त्यामध्ये आचार-विचार, कल्पना  या मुद्यांना लाक्षात घेऊन त्याची मांडणी केली आहे. १९७० मध्ये मनो-विश्लेषणासाठी  पहिल्यांदा या संकल्पनेचा उपयोग करण्यात आला. या पध्दतीच्या सिनेमामध्ये कल्पकतेला खूप महत्त्व दिले जाते.
हिंदी चित्रपटांत मात्र या संकल्पनेला जास्त महत्त्व दिले जात नाही. मात्र परदेशातील सिनेमामध्ये (अमेरिका) अशा कल्पकतेला खूप महत्त्व दिले जाते व हे त्यांच्या सिनेमामध्ये वेळोवेळी दिसून आले आहे. या मध्ये प्रामुख्याने असे दिसून येते की, एखादी लहान गोष्ट मोठी म्हणजे तिपटीने दाखवली जाते. हि एका प्रकारची कल्पना आहे व ती सिनेमा मधून दाखवली जाते. छोटा चेतन त्याच प्रकार लाईफ ऑफ पाय या सिनेमां मध्ये असे प्रकार  दाखवले आहेत. या सिद्धांतानुसार सिनेमा आणि विचार यांच्या मध्ये एक प्रकारे १९२० मध्ये यांच्या समावेश केला गेला होता. १९३० मध्ये या सिद्धांताचा वापर तंत्रज्ञानात करण्यात आला. या कल्पनेमुळे सिनेमा पाहत असताना तो मनोरंजक स्वरूपाचा वाटत असे. परदेशी सिनेमांमध्ये कल्पकतेला सुरूवाती पासून खूप महत्त्व दिले गेले होते.
 भारतात देखील दादासाहेब फाळके यांच्या पासून ते व्ही. शांताराम यांच्यापर्यत कल्पकतेचा समावेश केला होता . सिनेमा हा फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने पहिला जात होता .परंतू काळानुसार मात्र सिनेमा पाहण्याची पध्दती, त्यांची संकल्पना बदलत गेली. त्याचा प्रभाव आस झाला की, त्या त्या काळातील समाजाशी निगडीत असणाऱ्या समस्या सिनेमा मधून दाखवण्यत येऊ लागल्या. अशाप्रकारे या मधूनच सिनेमा हा जागतिक पातळीवर गेला आणि यामुळे सिनेमाला जागतिक स्वरूप प्राप्त झाले.

No comments:

Post a Comment