Thursday, 21 March 2013

Foregrounding




  ही संकल्पना  चित्रपट थेअरी आणि साहित्यातील भाषा याच्याशी संबंधीत आहे. चित्रपटाकडे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आणि लक्षवेधण्यासाठी त्यामध्ये नवनवीन गोष्टींचा समावेश केला जातो तसेच साहित्याच्या दृष्टीने वेधक शब्दरचनेचा उपयोग केला जातो. चित्रपटातील संवाद हा प्रभावी व्हावा कारण चित्रपटात संवाद हा महत्त्वाचा असतो. या थेअरीचा वापर चित्रपटामध्ये होत असल्याचे दिसते. जसे चित्रपटातील एक्शन, अपघात, रक्त, खूण ह्या सर्व गोष्टी चित्रपट बनवतांना केला जातो. हे सर्व गोष्टी लक्षवेधक असतात. तसेच संगीत, कॅमेरा ऍंगन ह्या गोष्टीही प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यास लक्षवेधक ठरत असता.
     चित्रपटातील दृश्य हे अत्यंत प्रभावीपणे दाखविण्यासाठी या थेअरीचा वापर केला जातो. प्रेक्षकांना जे दाखवितो ते खर आहे हे दाखविण्यासाठी ते प्रभावी करण्यासाठी याचा वापर होतो. चित्रपटातील दृश्य हे नकली वाटता ते प्रभावीपणे सादरकरण्यासाठी या थेअरीचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे साहित्यात अत्यंत प्रभावी भाषेचा वापर केला जातो, चित्रपटात जी भाषा वापरली जाते ती प्रेक्षकांना चांगल्याप्रकारे समाजावी तसेच जे लिखाण केले जाते ते अधिक चांगले होण्यासाठी foregrounding याचा वापर केला जातो. चित्रपटात आजच्या काळात संवादाला अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळेच चित्रपटाचे लिखाण संवाद हे चांगल्या दर्जाचे नवीन लक्षवेधक होणे तितकेच महत्त्वाचे आहे. याचाच अर्थ जेव्हा चित्रपटाचे लिखाण केले जाते ते अत्यंत काळजीपूर्वक होणे गरजेचे असते कारण त्यामध्ये असलेले कमी चूक ही चित्रपटाला चांगले बण्यापासून रोखत असते. चित्रपट निर्माण करण्याच्या दृष्टीने या थेअरीचा उपयोग महत्वाचा ठरतो.

No comments:

Post a Comment