
१६ जुन १९६० साली प्रदर्शीत झालेला सायको (Psycho)हा अल्फ्रेड हिचकॉक यांनी दिग्दर्शीत केलेला चित्रपट रहस्यमय कथा असलेला चित्रपट आहे.
चित्रपटातील कथेप्रमाणे त्यामध्ये वापरण्यात आलेल्या Camera Techniques , Camera Angles या सर्व गोष्टी वाखणण्या जोग आहेत. ज्याप्रमाणे चित्रपटाची कथा पुढे सरकत जाते त्याप्रमाणे प्रेक्षकांच्या मनातील कथेबद्दलची उत्कंठाही वाढीस लागते. प्रत्यक्ष चित्रपटाची सुरूवातच Long Shot प्रकारच्या Camera Angle ने झाल्याने आताच्या स्पायडर मॅन चित्रपटाचीच आठवण येते. त्यामध्येही विविध Long Shot वापरण्यात आले आहेत म्हणून.
चित्रपटातील नायिका ड्राईव्ह करत असताना बाहेर ज्यावेळेस जोरदार पाऊस पडत असतो तेव्हाचे Camera Techniques वापरून केलेले चित्रण, त्या परिस्थितीला शोभेल अस बॅकग्राऊन्ड म्युझिक हे खरोखरंच अप्रतिम असेच आहे. चित्रपटात एकुणच डायलॉग्स (प्रत्यक्ष संवाद) पेक्षा नॅरेशनचा वापर अधिक करण्यात आला आहे. परंतू असे असले तरीही चित्रपटाची कथा मात्र प्रेक्षकांना एकाच जागी खिळवून ठेवण्यात यशस्वी होते असे म्हटले तरी त्यात वावगे ठरणार नाही.

जोरदार पाऊस पडत असल्याने नायिका लॉज मध्ये रहावयांस गेल्यावर नायिकेची खाण्याबाबत गैरसोय होऊ नये म्हणून लॉज मालक आणि त्याची आई (जी प्रत्यक्षात नसतेही), या दोहोंमधिल संवाद, त्यांमधिल वादावादी आणि यामुळे नायिकेच्या चेह-यावरील हावभांव कॅमेराद्वारे ऊत्कृष्टरित्या टिपल आहे नव्हे तर नायिकेनेही चेह-यावरील ऊत्कृष्ट हावभांव दिल्याने त्या दोघांमधिल संवादाची तिव्रता प्रेक्षकांच्या लक्षात येते कि दोघांमधिल संवाद नेमक्या स्तरावर गेला आहे.
.jpg)
बॅकग्राऊन्ड म्युझिक, कॅमेरा टेक्निक्स यांमुळे कथा, कथेतील थ्रिलरनेस ज्याप्रमाणे चित्रपट रंगवत जाते त्याप्रमाणे प्रेक्षकांत चित्रपटाबाबत आणखी थ्रिलर जाणून घेण्याची उत्कंठाही नक्कीच वाढत असावी. कॅमेराची हालचाल ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे लॉजमालक आणि नायिका यांच्यातील संवादादरम्यान ऊत्कृष्ट ऑब्जेक्ट स्पेसींग अनुभवयास मिळते. नायिका कपडे बदलत असताना लूपहोल मधून बघणारा लॉजमालक आणि केवळ त्याच्या डोळ्यावरच कॅमेराद्वारे केलेला फोकस हे देखिल पाहणा-याच्या नजरेस भिडूनच जाते.
शॉवर खाली आंघोळ करताना घेण्यात आलेला कॅमेरा शॉट, कॅमेराद्वारे टिपलेल्या प्रत्येक बॉडी मूव्हमेंट आणि सर्व काही कळायच्या दरम्यानच तीच्यावर होणारा जिवघेणा हल्ला आणि त्यात होणारा तिचा मृत्यु हे सर्व कॅमेराद्वारे विविध त-हेने उत्कृष्टरित्या टिपले आहे. याच दरम्यान चित्रपटातील खरा थ्रिलनेस अनुभवायला मिळतो. त्यानंतर तिच्या वजनाने तुटणारा पडदा,वाहत जाणारे रक्त हे देखिल कॅमेराद्वारे उत्कृष्टरित्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा सर्व मध्यांतर चांगल्या दिग्दर्शनाने पहावयास मिळाला.


No comments:
Post a Comment